टी 20 मध्ये कोण ठोकू शकतं द्विशतक... ही घ्या यादी!

अनिरुद्ध संकपाळ

टी 20 क्रिकेटमध्ये सध्या शतकी खेळी करणे ही एक सामन्य गोष्ट झाली आहे. टी 20 क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज द्विशतक ठोकेल हे दिवास्वप्न नक्कीच राहिलेले नाही. क्रिकेट वर्तुळात 5 फलंदाज आहेत जे टी 20 मध्ये द्विशतकी खेळी करू शकतात.

T20 Cricket

शुभमन गिल

भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल टी 20 मध्ये द्विशतक ठोकू शकतो. त्याने नुकतेच आयपीएलमध्ये 3 शतके ठोकली आहेत. तो मोठी खेळी करण्यासाठी उत्सुक असतो.

shubman Gill

जॉस बटलर

इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जॉस बटलरच्या बॅटमधून देखील टी 20 मध्ये द्विशतक येऊ शकते. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये 5 शतके आहेत. त्याने इंग्लंडकडूनही आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक ठोकले आहे.

Jos Buttler

क्विंटन डिकॉक

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डिकॉकमध्ये देखील टी 20 मध्ये द्विशतक ठोकण्याची क्षमता आहे. तो पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलतो. त्याच्या नावावर टी 20 मध्ये तीन शतके देखील आहेत. तो द्विशतक ठोकण्याची किमया करू शकतो.

quinton de kock

सूर्यकुमार यादव

भारताचा 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादव जरी सलामीवीर नसला तरी त्याच्याकडे टी 20 मध्ये द्विशतक ठोकण्याची क्षमता आहे. त्यामुळे तो देखील टी 20 मध्ये द्विशतकाचा चमत्कार घडवू शकतो.

Suryakumar Yadav

ग्लेन फिलिप्स

न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन फिलिप्स देखील टी 20 मध्ये धमाका करतोय. त्याने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेविरूद्ध शतकी खेळी केली होती. तो देखील टी 20 मध्ये द्विशतक ठोकण्याचा दम ठेवतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

glenn phillips