आश्चर्याचा धक्का! पाच सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डांपैकी तीन आशियातील

अनिरुद्ध संकपाळ

बीसीसीआय हा क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे हे सर्वांना माहिती आहेच. मात्र श्रीमंतीच्या बाबतीत बीसीसीआयच्या आसपासही कोणी नाही.

बीसीसीआयची एकूण संपत्ती ही 18 हजार 760 कोटी रूपये इतकी आहे.

बीसीसीआयनंतर श्रीमंतीच्या बाबतीत क्रिकेट ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर येते. मात्र त्यांची एकूण संपत्ती ही हजारो कोटी सोडा साधी सातशे कोटी देखील नाही. त्यांची एकूण संपत्ती ही 658 कोटी रूपये इतकी आहे.

ऑस्ट्रेलियानंतर तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंड क्रिकेट बोर्ड येतो. त्यांची एकूण संपत्ती ही 492 कोटी रूपये आहेत.

श्रीमंतीच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर कायम पैशाच्या बाबती अधाशीपणा दाखवणारा पाकिस्तानचे क्रिकेट बोर्ड आहे. त्यांची एकूण संपत्ती ही 458 कोटी रूपये आहे.

पाचव्या क्रमांकावर आशिया खंडातील बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा समावेश आहे. त्यांची एकूण संपत्ती ही 425 कोटी रूपये आहे. म्हणजे ते पाकिस्तानला गाठण्यापासून फार लांब नाहीयेत.