Elon Musk: या ८ पुस्तकांनी बदललं इलॉन मस्कचं आयुष्य; तुम्ही वाचलीत का?

Sudesh

Elon Musk

स्पेस एक्स, टेस्ला अशा मोठ्या कंपन्यांचे फाउंडर इलॉन मस्क तुम्हाला माहिती असतीलच. सध्या इलॉन हे जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या आयुष्यावर प्रभाव पाडणारी आठ पुस्तकं कोणती आहेत याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Elon Musk Life Changing Books | eSakal

Benjamin Franklin

मस्क यांनी एका मुलाखतीत सांगितलं, की वॉल्टर आयझॅक्सन यांचं हे पुस्तक त्यांच्यासाठी अगदी प्रेरणादायी ठरलं. 'तो (बेंजामिन) घरातून पळून गेलेला एक मुलगा होता. त्याने शून्यातून आपलं साम्राज्य उभारलं.' असं ते म्हणाले.

Elon Musk Life Changing Books | eSakal

The Lord Of the Rings

जे. आर. आर. टॉल्किन यांनी लिहिलेली ही पुस्तकं इलॉन यांना प्रचंड आवडतात. यासोबतच 'फाउंडेशन' सीरीज वाचल्यामुळे जगाला वाचवणं आपलं कर्तव्य असल्याचं इलॉन यांना वाटतं.

Elon Musk Life Changing Books | eSakal

Ignition

रॉकेट या विषयाबद्दल जॉन डी. क्लार्क यांचं इग्निशन हे पुस्तक उत्तम असल्याचं मत इलॉन यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं.

Elon Musk Life Changing Books | eSakal

Zero to One

पीटर थिएल यांचं हे पुस्तक स्टार्टअप करणाऱ्याची इच्छा असणाऱ्यांसाठी उत्तम मार्गदर्शिका आहे. पीटर यांनी मोठमोठ्या कंपन्या उभारल्या आहेत, आणि ते कसं केलं याबाबत या पुस्तकात सांगितलं आहे, असं मस्क म्हणतात.

Elon Musk Life Changing Books | eSakal

Superintelligence

निक बोस्टॉर्म यांचं हे पुस्तक सर्वांनी एकदा वाचायलाच हवं असं इलॉन यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी एआयबद्दल इशाराही दिला. आर्टिफिशिअल इंटिलिजेन्स ही अणुबॉम्बपेक्षा घातक गोष्ट आहे असं ते म्हणतात.

Elon Musk Life Changing Books | eSakal

Howard Hughes

डोनाल्ड एल. बार्लेट आणि जेम्स बी. स्टीले यांनी लिहिलेलं हे पुस्तक इलॉन यांचं फेव्हरेट आहे.

Elon Musk Life Changing Books | eSakal

The Hitchhiker's Guide to the Galaxy

डॉग्लस अ‍ॅडम्स यांचं हे पुस्तक मस्क यांच्यासाठी एक सकारात्मक आशेचा किरण ठरलं. किशोरवयीन अवस्थेत जेव्हा एक्झिस्टेन्शिअल क्रिसिसमधून ते जात होते, तेव्हा या पुस्तकानेच त्यांना सावरलं.

Elon Musk Life Changing Books | eSakal

Einstein : His Life and Universe

वॉल्टर आयझॅक्सन यांचं हे पुस्तक मस्क यांच्यासाठी प्रेरणादायी ठरलं. अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या या जीवन चरित्रातून आपण बरंच काही शिकलो, असं मस्क म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk Life Changing Books | eSakal