शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या दुर्गा!

साक्षी राऊत

नरगिस मोहम्मदी यांना आज नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. आतापर्यंत कोणकोणत्या महिलांना शांततेचा नोबल पुरस्कार मिळालाय ते जाणून घेऊया.

Nobel Peace Prize To Navdurga

नादिया मुराद

लैंगिक हिंसाचाराच संपविण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी २०१८ मध्ये नादिया मुराद यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Nobel Peace Prize To Navdurga

मलाला युसूफझाई

"मुलांच्या आणि तरुणांच्या दडपशाहीविरूद्ध आणि सर्व मुलांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी त्यांच्या संघर्षासाठी त्यांना २०१४ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Nobel Peace Prize To Navdurga

एलेन जॉन्सन-सर्लिफ, लेमाह ग्बोई, तवाकुल करमान

महिलांच्या हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी अहिंसेच्या मार्गाने संघर्ष करणाऱ्या एलेन, तर महिलांच्या सुरक्षेसाठी आणि शांतता निर्माण कार्यात महिलांच्या पूर्ण सहभागासाठी त्यांच्या अहिंसक संघर्षासाठी लेमाह ग्बोई आणि तवाकुल करमान यांना एकाचवर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार २०११ मध्ये प्रदान करण्यात आला.

Nobel Peace Prize To Navdurga

वंगारी मथाई

शाश्वत विकास, लोकशाही आणि शांतता यासाठी त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना शांततेचा २००४ मध्ये नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Nobel Peace Prize To Navdurga

रिगोबेर्ता मेन्चु

"मूळनिवासी लोकांच्या हक्कांसाठी आणि त्यांना सामाजिक न्याय आणि वांशिक-सांस्कृतिक सलोख्यासाठीच्या त्यांच्या संघर्षासाठी त्यांना १९९२ मध्ये नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Nobel Peace Prize To Navdurga

आँग सान सू क्यी

लोकशाही आणि मानवी हक्कांसाठी त्यांच्या अहिंसक संघर्षासाठी त्यांना १९९१ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Peace Prize To Navdurga