Nysa Devgan: पार्टीत न्यासाला फॅन्सनी ओळखलं नाही...

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमधील स्टार किड्सच्या चर्चा नेहमीच असतात. सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण हिचेसुद्धा फॉलोअर्स भरपूर आहेत.

सध्या बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्ट्यांचा माहोल सुरु आहे. त्यामुळे सगळे स्टार अभिनेते एकमेकांच्या घरी जात आहेत.

रविवारी रात्री न्यासा देवगण एका दिवाळी पार्टीत दिसून आली. मात्र उपस्थित लोकांनी चक्क तिला ओळखलं नाही.

मागे एकदा न्यासाला भूमी पेडणेकरच्या दिवाळी पार्टीत गोल्डन लहेंग्यात पाहिला होतं. यावेळीदेखील ती प्रिंटेड ग्रीन कलरच्या लहेंग्यात दिसली.

आपल्या एका मित्रासह ती कारमधून पार्टीसाठी पोहोचली होती. मात्र या पोषाखात तिला ओळखणं अवघड होऊन बसलं होतं.

या पार्टीमधील फोटोंमध्ये न्यासा खूपच आकर्षक दिसत होती. पार्टीमध्ये न्यासाच्या जवळ उभ्या असलेल्या फोटोग्राफरनेही तिला ओळखलं नव्हतं.

याचा व्हीडिओदेखील समोर आला. व्हीडिओमध्ये न्यास खूप वेगळी दिसत होती. तिने चेहऱ्यावर काहीतरी वेगळा मेकअप केल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर अनेक युजर्सनी न्यासाच्या नाकासंबंधी प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने नाकाची सर्जरी केलीय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनेक जणांनी तिला जान्हवी कपूरसोबत कंपेयर केलं आहे. न्यासाने नेमकं काय केलं, हे कळू शकलं नसलं तरी सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nysa Devgan