Kajol Birthday: वयाच्या पन्नाशीतही Bollywood मध्ये काजोलची जादू कायम

सकाळ डिजिटल टीम

भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्रीपैकी एक म्हणजे काजोल. साधेपणा आणि आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी सोबतच अभिनयाने काजोलने रसिकांची मने जिंकली.

बॉलिवूड अभिनेत्री काजोलने आज वयाची 48 वर्षे पूर्ण केली आहेत. तिचा जन्म 5 ऑगस्ट 1974 रोजी मुखर्जी कुटुंबात झाला होता.

वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी काजोलने मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते.

काजोलचे वडील सोमू मुखर्जी दिग्दर्शक होते, तर आई तनुजा अभिनेत्री आहे. त्यामुळे लहानपणापासूनच ती त्याच वातावरणात वाढली.

काजोलची आई तनुजा मराठी तर वडील बंगाली होते. त्यामुळे काजोल उत्तम मराठी बोलते.

काजोलने वयाच्या 16व्या वर्षी तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. ‘बेखुदी’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला.

त्यानंतर 1993मध्ये काजोल ‘बाजीगर’ चित्रपटात झळकली. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोलची जोडी प्रेक्षकांना खुप आवडली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरला

त्यानंतर ‘करण-अर्जुन’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सारखे एकामागून एक हिट चित्रपट काजोलने दिले आणि बॉलीवूडची सुपरहीट अभिनेत्री बनली.

अजय आणि काजोल या जोडीने ‘प्यार तो होना ही था' या चित्रपटावेळी आपले एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले. 1999मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.