प्राजक्ता माळीच्या हातावर टॅटू; गोंदवलंय 'या' खास व्यक्तीचं नाव

Aishwarya Musale

अभिनेत्री

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिचं सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोईंग आहे. 

prajakta mali | sakal

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळीने आपल्या हातावर एका खास व्यक्तीचं नाव गोंदवून घेतलंय. हे व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु ओशो.

prajakta mali | sakal

राजश्री मराठी

राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्तानं आपला टॅटू दाखवत तो गोंदवण्यामागचं कारण देखील सांगितलं होतं. प्राजक्ताला आपल्या हातावर नेहमीपेक्षा काहीतरी हटके टॅटू हवा होता.

prajakta mali | sakal

ओशोंबद्दल खूप वाचन करायचे

याबद्दल बोलताना ती म्हणाली होती की, 'मी ओशोंबद्दल खूप वाचन करायचे, त्यांच्या सीडी ऐकायचे. माझी त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे.

prajakta mali | sakal

टॅटू

त्यांचं नाव टॅटू म्हणून का गोंदवलं हे सांगताना प्राजक्ता म्हणाली, 'मला सगळ्यांसारखं फुलं, हृदय, चंद्र, चांदणं अशा कॉमन गोष्टी टॅटू म्हणून नको होत्या.

prajakta mali | sakal

प्रेरणादायक

मला काहीतरी वेगळं हवं होतं. मला टॅटू म्हणून अशी एखादी गोष्ट हवी होती जी प्रेरणादायक असेल आणि धर्माशी निगडित नसेल.'

prajakta mali | sakal

ओशोंची भक्त

त्याबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली, ' तेव्हा मी ओशोंची भक्त झाले होते आणि त्यांच्या मते धर्म वगैरे असं काही नसतं.

prajakta mali | sakal

धर्म

मी जात, धर्म अशा गोष्टी मानत नाही. त्यामुळे मी ठरवलं की ओशो हे धर्मनिरपेक्ष नाव आपण गोंदवु शकतो आणि मी त्या नावाचा टॅटू गोंदवला.' असा खुलासा प्राजक्तानं केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

prajakta mali | sakal