म्हणुन राष्ट्रवादी सोडत धरली भाजपची वाट! प्रिया बेर्डेंचा खुलासा...

Vaishali Patil

अभिनय क्षेत्र

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बेर्डे या अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या त्या  'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'सिंधुताई माझी माई' मालिकेत काम करत आहेत.

Actress Priya Berde Said Why She Left Ncp And Join Bjp

राजकारण

मनोरंजन विश्वाबरोबरच त्या राजकारणातही सक्रिय आहेत.

Actress Priya Berde Said Why She Left Ncp And Join Bjp

प्रिया बेर्डे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला.

कारण

प्रिया बेर्डे यांनी नुकतीच एका यूट्युब चॅनलेवर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का सोडला त्यामागची कारण सांगितली.

Actress Priya Berde Said Why She Left Ncp And Join Bjp

भाजपा पक्षात काम करण्याची जास्त संधी असल्याचं त्यांना वाटते.

Actress Priya Berde Said Why She Left Ncp And Join Bjp

भाजप पक्ष

त्या म्हणतात की, 'मला भाजपात जास्त चांगल्या पद्धतीनं ऐकलं गेलं. माझं म्हणणं ऐकण्यासाठी इथे लोक भेटतात.'

Actress Priya Berde Said Why She Left Ncp And Join Bjp

पुढे प्रिया म्हणतात की, अनेक मोठमोठे नेते त्यांना भेटतात त्यांचं म्हणणे ऐकतात. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल बोलतांना त्यांनी सांगितलं की, 'सांस्कृतिक विषयाबद्दल एवढं ज्ञान असलेला नेता अजूनपर्यंत त्यांनी पाहिला नव्हता.'

Actress Priya Berde Said Why She Left Ncp And Join Bjp

राष्ट्रवादी पक्ष

राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलतांना प्रिया म्हणाल्या की, राष्ट्रवादीमध्ये त्यांनी दोन-अडीच वर्षं  जिल्हाध्यक्ष म्हणुन काम केली आहेत. तिथे छोट्या पातळीवर काम करण्याची संधी मिळत होती. मात्र भाजपात जिल्हा पातळीपेक्षा प्रदेशभर चांगलं काम करण्याची संधी त्यांना मिळाल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Priya Berde Said Why She Left Ncp And Join Bjp