कतरिनाची होणारी जाऊ आहे महाराष्ट्राची लेक! शिवसेनेशी आहे तिचं खास कनेक्शन

अंकिता खाणे (Ankita Khane)

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ ही देखील महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांची नात आहे.

sharvari wagh | Esakal

राजकीय कुटुंबातून आलेल्या शर्वरीनं बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली.

sharvari wagh | Esakal

शर्वरी ही शेवसेना नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे.

sharvari wagh

एका राजकीय कुटुंबातून येऊनही तिनं करिअरसाठी ग्लॅमर दुनियेची निवड केली.आज आपल्या अभिनयाने ती सर्वांचे मन जिंकताना दिसते.

sharvari wagh | Esakal

शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांची मुलगी आहे. शर्वरीच्या वडिलांचे नाव शैलेश वाघ असून ते प्रसिद्ध उद्योगपती आहेत.

sharvari wagh | Esakal

शर्वरी वाघ ही विकी कौशलचा भाऊ अभिनेता सनी कौशलची जवळची मैत्रिण आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नालाही शर्वरीही उपस्थित होती.

sharvari wagh | Esakal

तेव्हापासून शर्वरी सनीला डेट करत आहेत व ही दोघं लग्न करणार असल्याची चर्चा रंगली. मात्र दोघांनी यावर बोलणं टाळलं. त्यामुळे शर्वरी कतरिनाची जाऊ होईल का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

sharvari wagh | Esakal

शर्वरी 'बंटी और बबली 2' च्या आधीपासून फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. खरे तर तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली.

sharvari wagh | Esakal

शर्वरीनं 'प्यार का पंचनामा 2', 'बाजीराव मस्तानी' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sharvari wagh | Esakal