राज ठाकरे आणि शर्मिला यांची प्रेमपत्रं एकमेकापर्यंत पोहोचवायची 'ही' अभिनेत्री

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठी नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

raj Thackeray and Sharmila Thackeray | Esakal

वंदना गुप्ते लवकरत 'बाईपण भारी देवा' या केदार शिंदे दिग्दर्शित सिनेमातही दिसणार आहेत. येत्या ३० जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत असून सहा महिलांची त्यांच्या आयुष्यातील कसरत या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

raj Thackeray and Sharmila Thackeray | Esakal

या दरम्यान त्यांची एक मुलाखत आणि राज ठाकरे यांच्याविषयी त्यांनी सांगितलेलं गुपित चर्चेत आलं आहे.

raj Thackeray and Sharmila Thackeray | Esakal

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह वंदना यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. मुंबईतील दादर याठिकाणी असणाऱ्या शिवाजी पार्क परिसरात त्यांची घरं असल्याने एकमेकांच्या घरी येणेजाणेही आहे.

raj Thackeray and Sharmila Thackeray | Esakal

राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये वंदना यांनी उलगडा केला की त्यांनी चक्क राज आणि शर्मिला यांची प्रेमपत्र एकमेकांपर्यंत पोहोचवली आहेत.

raj Thackeray and Sharmila Thackeray | Esakal

शर्मिला आणि वंदना यांची मैत्रीही खूप आधीपासूनची आहे. मोहन वाघ यांच्या अनेक नाटकांमध्ये वंदना यांनी काम केल्याने त्यांच्या कन्या शर्मिला यांच्यासोबत त्यांची चांगली मैत्री आहे.

raj Thackeray and Sharmila Thackeray | Esakal

वंदना म्हणाल्या की, 'मी त्या दोघांची (राज आणि शर्मिला ठाकरे) प्रेमपत्रं पोहोचवली आहेत. मोहन वाघ यांची लेक शर्मिला या राज ठाकरेंच्या पत्नी आहेत.

raj Thackeray and Sharmila Thackeray | Esakal

मोहन वाघ यांच्या अनेक नाटकांमध्ये मी काम केल्याने शर्मिला आणि माझ्यात चांगली मैत्री आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

raj Thackeray and Sharmila Thackeray | Esakal