अधिकमासासाठी परफेक्ट अनारसे बनवायचे आहेत? ही घ्या खास ट्रिक

धनश्री भावसार-बगाडे

अधिकमासात अनारसे

अधिकमासात जावयाला अनारसे देण्याचा मान असतो. असं शास्त्रात सांगितले आहे.

Adhik Maas Anarase | esakal

साहित्यः

3 कप तांदूळ, 3 कप पिठी साखर किंवा गूळ, 1 टेस्पून तळण्यासाठी तूप, १/२ टीस्पून दूध, ३-४ चमचे खसखस,

Adhik Maas Anarase | esakal

कृती स्टेप 1

तांदूळ धुवून 3 दिवस पाण्यात भिजत ठेवा. दररोज पाणी बदला, चौथ्या दिवशी, तांदूळ चाळणीवर किंवा कॉटनच्या कपड्यावर सुकायला ठेवा. तांदूळ चांगले कोरडे फडफडीत होऊ द्या.

Adhik Maas Anarase | esakal

स्टेप 2

कोरडे झालेले तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. (घरी फूड प्रोसेसर किंवा ग्राइंडरमध्ये दळलेले तांदूळ पूर्णपणे कोरडे होऊ देऊ नका, अन्यथा दळण्यास बराच वेळ लागू शकतो)

Adhik Maas Anarase | esakal

स्टेप 3

आता तांदळाची पूड बारीक जाळीच्या चाळणीने चाळून घ्या. यातले काही पीठ राखून ठेवा आणि उरलेल्या तांदळाच्या पावडरमध्ये गूळ किंवा साखर घाला

Adhik Maas Anarase | esakal

स्टेप 4

गूळ टाकल्यानंतर गूळ पिठामध्ये चांगला एकजीव करून घ्या. त्यांतर थोडे दूध आणि तूप घालून मिश्रण मळून घ्या. दूध टाकताना काळजी घ्या, पीठ पातळ होता कामा नये.

Adhik Maas Anarase | esakal

स्टेप 5

आता हे अनारसेचे तयार पीठ एक दिवस हवा बंद डब्यामध्ये झाकून ठेवा.

Adhik Maas Anarase | esakal

स्टेप 6

दुसऱ्या अनारसेचे पीठ पुन्हा एकदा चांगले मळून घ्या, छोटे गोळे करू खसखसवर हलके दाबा. पीठ गोल चकतीमध्ये सपाट करा. पीठ चिकटत असेल तर हाताला थोडे तूप लावा

Adhik Maas Anarase | esakal

स्टेप 7

दरम्यान एका फ्राईंग पॅनमध्ये 3-4 चमचे तूप मध्यम आचेवर गरम करा. अनारसा तुपात तळून घ्या. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळत राहा. तुपाचे तापमान नियंत्रणात ठेवा. फक्त मध्यम आचेवर गरम करा नाहीतर अनारसा फुटण्याची शक्यता असते.

Adhik Maas Anarase | esakal

स्टेप 8

अनारसे छान तळून झाल्यावर टिश्यू पेपरमध्ये काढा म्हणजे अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होईल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adhik Maas Anarase | esakal