अधिकमासात तुळशीशी निगडीत या 6 चुका अजिबात करू नका, नाहीतर...

धनश्री भावसार-बगाडे

अधिकमास

अधिकमास उद्यापासून (१८ जुलै २०२३) सुरू होत आहे. १६ ऑगस्ट २०२३ पर्यंत अधिकमास असणार आहे.

Adhik Maas 2023 | esakal

विष्णूंना समर्पित महिना

अधिकमास हा भगवान विष्णूंना समर्पित महिना असून अधिकमासात विष्णू योगनिद्रेत असले तरी त्यांची कृपा प्राप्त करता येतो.

Adhik Maas 2023 | esakal

तुळशीशी निगडीत चुका

तुळस विष्णूला प्रिय असते. तुळशीदल विष्णूला अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात असे मानले जाते. त्यामुळे तुळशीशी निगडीत या चुका टाळणे फार आवश्यक असते.

Adhik Maas 2023 | esakal

संध्याकाळी पूजा

जर तुम्ही संध्याकाळी तुळशीची पूजा करत असाल तर चुकूनही तुळशीला स्पर्श करून नका. यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते.

Adhik Maas 2023 | esakal

मोकळे केस

तुळशीची पूजा करताना केस मोकळे सोडू नये. केस बांधून ठेवावे.

Adhik Maas 2023 | esakal

पानं तोडणे

तुळशीची पानं तोडताना नखाने किंवा झटका देऊन तोडू नये. प्रेमाने हळूवारपणे पाने तोडावी.

Adhik Maas 2023 | esakal

चुनरी

काही लोक तुळशीची पूजा करताना त्यावर चुनरी ओढतात. पण ती बदलत नाहीत. इतर देवी देवतांना वाहिलेली वस्त्र जशी बदलतात तशी चुनरीही बदलावी.

Adhik Maas 2023 | esakal

प्रदक्षिणा

तुळशीला पाणी घातल्यावर न विसरता प्रदक्षिणा घालणे आवश्यक असते. किमान ३ प्रदक्षिणा घालाव्या.

Adhik Maas 2023 | esakal

एकादशी

तुळशीला रविवारी किंवा एकादशीच्या दिवशी पाणी घालू नये. असं म्हटलं जातं की, या दिवशी तुळशीचा उपवास असतो.

Adhik Maas 2023 | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adhik Maas 2023 | esakal