अडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओनचे निधन; वयाच्या 26 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

priyanka kulkarni

निधन

अडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओनीचे (Sophia Leone) निधन झाले आहे. 

Sophia Leone | esakal

वयाच्या 26 व्या वर्षी सोफियानं अखेरचा श्वास घेतला आहे.

Sophia Leone | esakal

अपार्टमेंटमध्ये आढळला मृतदेह

रिपोर्टनुसार, आठवडाभरापूर्वी सोफिया तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली होती.

Sophia Leone | esakal

सोफियाच्या कुटुंबीयांनी फोनवर तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 

Sophia Leone | esakal

सोफियाचे सावत्र वडील माईक रोमेरो यांनी सोफियाच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. सोफियाच्या मृत्यूचा सध्या तपास सुरु आहे.

Sophia Leone | esakal

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोफिया काही दिवसांपासून तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय होती, जिथे तिने काही पोस्ट अपलोड केल्या होत्या. 

Sophia Leone | esakal

कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

सोफियाच्या सावत्र वडिलांनी सांगितलं की, "सोफियाच्या आई आणि कुटुंबाच्या वतीने, मला आमच्या प्रिय सोफियाच्या निधनाची बातमी तुम्हा सर्वांना सांगायची आहे. सोफियाच्या आकस्मिक मृत्यूने तिच्या कुटुंबावर आणि मित्रांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे."

Sophia Leone | esakal

"सोफियाच्या मृत्यूचा तपास सध्या स्थानिक पोलिसांकडून करत आहेत. सोफिया ही एक चांगली मुलगी, बहीण, नात, भाची आणि मैत्रिणी होती. तिला प्राण्यांची आवड होती. तसेच तिला फिरायला आवडायचे.", असंही सोफियाच्या सावत्र वडिलांनी सांगितलं.

Sophia Leone | esakal

तीन महिन्यांच्या कालावधीत, अडल्ट चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या मृत्यूंमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sophia Leone | esakal