Anuradha Vipat
'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या टीव्ही शोद्वारे घराघरात नाव कमावलेला अभिनेता शीजान खानला तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
या प्रकरणामुळे अभिनेत्याला शोमधूनही बाहेर काढण्यात आले होते. पण आता शीझान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, शीझान लवकरच टीव्हीच्या 'चांद जलने लगा' मध्ये सेकंड लीड म्हणून प्रवेश करणार आहे.
सध्या 'चांद जलने लगा'मध्ये अभिनेत्री कनिका मान आणि अभिनेता विशाल आदित्य सिंग मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते.
दरम्यान, या शोशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, “या शोमध्ये दुसऱ्या पुरुष सेकेंड लीडसाठी शीजानची निवड करण्यात आली आहे.
याआधी हा अभिनेता टीव्हीच्या सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी'च्या 13व्या सीझनमध्ये दिसला होता.
आजकाल शीजान खान आपला मेकओव्हर करण्यात व्यस्त आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.