जंगली प्राण्यांनाही लागली जंक-फूडची चटक? पाहा कसे गोलू-मोलू दिसतायत

Sudesh

जंक फूड

चटकदार जंक-फूडचे तोटे आपणा सर्वांनाच माहिती आहेत. मात्र, तरीही त्याची सवय सोडणं अवघड जातं. मात्र, जर जंगलातील प्राण्यांनाही याची चटक लागली, तर ते कसे दिसतील याची कल्पना एका एआय क्रिएटरने केली.

AI Animals | Esakal

ससा

छोटूसा ससा तसं तर कायम उड्या मारत असतो, मात्र जंक फूड खाऊन वजन वाढल्यानंतर त्याला तसं करता येईल का? ज्यो जॉन मुल्लूर या एआय आर्टिस्टने हे फोटो बनवले आहेत.

AI Animals | Esakal

लांडगा

लबाड लांडगा खरंतर चलाख असतो, मात्र जंक-फूडचे धोके त्याच्या लक्षात कसे आले नाहीत?

AI Animals | Esakal

झेब्रा

जंक-फूड खाऊन लठ्ठ झालेला झेब्रा नक्कीच एखाद्या मांसाहारी प्राण्याची शिकार होईल.

AI Animals | Esakal

वाघ

जंक-फूडची सवय लागून लठ्ठ झालेल्या या वाघोबाला पाहून जंगलातील लहान प्राण्यांनी तर सुटकेचा निःश्वास सोडला असेल.

AI Animals | Esakal

तरस

इतर प्राण्यांची शिकार पळवणारे तरसही जंक-फूड खाऊन जाड झालंय.

AI Animals | Esakal

घुबड

जंक-फूडमुळे एवढं लठ्ठ झालेलं घुबड आता आपली मान पूर्णपणे वळवू शकेल का?

AI Animals | Esakal

रकून

रकून तर खरोखरंच कचऱ्यातील अन्न खाऊन जगतं. मात्र, जंक-फूडने त्यालाही अगदी लठ्ठ करून सोडलंय.

AI Animals | Esakal

स्टॅग

अतिशय सुंदर शिंगं असणारा हा प्राणी, जंक-फूडमुळे मात्र एकदम लठ्ठ दिसतोय.

AI Animals | Esakal

सिंह

अगदी जंगलाच्या राजाला देखील जंक-फूडच्या सवयीनं बेजार केलं आहे. शिकार करणं दूरच, आता हा राजा जागचा हलू तरी शकतो का याबाबत शंका आहे.

AI Animals | Esakal

चित्ता

वेगाने धावणारा प्राणी म्हणून ओळख असणारा चित्ता, जंक-फूड खाऊन मात्र किती जाड झाला आहे. आता हा वेगाने चालू शकला तरी खूप झालं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Animals | Esakal