Indian Army : परदेशी भूमीत भारतीय जवानांनी दिला 'बजरंग बली की जय'चा नारा

सकाळ डिजिटल टीम

संयुक्त लष्करी सराव

युनायटेड किंगडममध्ये 'अजेय वॉरियर-23' हा संयुक्त लष्करी सराव सुरू आहे. यामध्ये भारतीय आणि ब्रिटीश सैन्यांचा सहभाग आहे.

बिहार रेजिमेंटच्या तुकड्यांचा समावेश

या सरावात युनायटेड किंगडमच्या 2 रॉयल गोरखा रायफल्स आणि भारतीय लष्कराच्या बिहार रेजिमेंटच्या तुकड्यांचा समावेश आहे.

भारतीय जवानांनी दाखवलं धैर्य

हा लष्करी सराव 11 मे रोजी संपला. यामध्ये भारतीय जवानांनी त्यांचं धैर्य दाखवलं.

ब्रिटनला पोहोचले जवान

भारतीय लष्करानं सांगितलं की, 26 एप्रिल रोजी भारतीय सैनिक सी-17 विमानानं ब्रिटनच्या ब्रीझ नॉर्टन इथं पोहोचले होते.

दोन्ही देशांत सौहार्द भावना

लष्कराच्या म्हणण्यानुसार, दोन्ही देशांमधील परस्पर सौहार्द राखण्यासाठी अशा प्रकारचे सराव आयोजित केले जातात.

ब्रिटिश सैनिक मायभूमीत दाखल

यापूर्वीही भारतात असं घडलं आहे. त्यावेळी ब्रिटिश सैनिक आमच्या मायभूमीत दाखल झाले होते.

बजरंग बलीचा नारा

दरम्यान, भारतीय लष्करानं एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये सैनिक बजरंग बलीचा नारा देताना दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army United Kingdom