आगरकरने 'नाटक' करणाऱ्या स्टार खेळाडूला केलं होतं सुतासरखं सरळ!

अनिरुद्ध संकपाळ

निवडसमिती अध्यक्ष

मुंबईचा अष्टपैलू खेळाडू अजित आगरकरने नुकतेच बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरूष संघाचे निवडसमिती अध्यक्षपद स्विकारले आहे.

Ajit Agarkar

सडेतोड अजित आगरकर

अजित आगकर हा दिसायला जरी सोज्वळ वाटत असला तरी तो खूप कडक आणि सडेतोड वृत्तीचा आहे. त्याच्या या सडेतोड वृत्तीचे अनेक किस्से मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात प्रसिद्ध आहेत.

Ajit Agarkar

किस्सा स्टार क्रिकेटपटूचा

हा किस्सा दीड ते दोन वर्षापूर्वीचा आहे. भारतीय संघात खेळून आलेल्या एका स्टार खेळाडूला मुंबईचा रणजी ट्रॉफीचा सामना चुकवायचा होता.

Ajit Agarkar

दुखापतीचं नाटक

मुंबईसाठी हा सामना महत्वाचा असल्याने त्यांचा सर्वोत्तम खेळाडू संघात असणं गरजेचं होतं. मात्र या स्टार खेळाडूने दुखापतीचे कारण देत अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला.

Ajit Agarkar

खोलात चौकशी

मात्र मुंबई निडवसमितीचा अध्यक्ष असलेल्या अजित आगरकरने खोलात जाऊन चौकशी केली. त्यावेळी तो 31 डिसेंबरला पार्टी करता यावी यासाठी हे नाटक करत असल्याचे आढळून आले.

Ajit Agarkar

आगरकरचा थेट यॉर्करच

अजित आगरकरने त्या स्टार खेळाडूला आपण तुझी फिटनेस टेस्ट घेऊ जर दुखापत गंभीर असेल तर बीसीसीआयला कळवून तुला चांगले उपचार घेता येईल अशी सोय करू असा संदेश पाठवला.

आला सुतासारखा सरळ

हा नाटकी स्टार खेळाडू आपलं पितळ उघडं पडणार म्हटल्यावर सुतासारखा सरळ आला. त्याने गपचूप रणजी ट्रॉफी सामना खेळण्याची तयारी दर्शवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.