पत्नी ट्विंकलच्या पुस्तकातील पात्रांवर अक्षयने उपस्थित केले प्रश्न? अभिनेत्रीने दिले हृदयस्पर्शी उत्तर

Anuradha Vipat

लेखिका म्हणून ओळख निर्माण

चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणारी ट्विंकल खन्ना सध्या चित्रपट जगतापासून दूर आहे. मात्र, तिने एक लेखिका म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

Akshay and Twinkle

वेलकम टू पॅराडाइज

सध्या अभिनेत्री तिच्या नवीन पुस्तक 'वेलकम टू पॅराडाइज'मुळे चर्चेत आहे.

Akshay and Twinkle

एक रंजक संवाद

ट्विंकल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्यात आणि अक्षय कुमार यांच्यात एक रंजक संवाद घडत आहे.

Akshay and Twinkle

व्हिडिओ क्लिप

ट्विंकल खन्नाने इंस्टाग्रामवर शेअर केलेली व्हिडिओ क्लिप तिच्या 'वेलकम टू पॅराडाइज' या पुस्तकाच्या लाँचची आहे.

Akshay and Twinkle

अक्षय कुमार तिला प्रश्न विचारत आहे

या क्लिपमध्ये ट्विंकल खन्ना स्टेजवर बसलेली दिसत आहे, तर तिचा पती आणि प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार तिला काही प्रश्न विचारत आहे.

Akshay and Twinkle

अतिशय मजेशीर प्रश्न

अक्षय कुमार ट्विंकल खन्नाला अतिशय मजेशीरपणे विचारतोय, 'तुमच्या 'वेलकम टू पॅराडाईज' या पुस्तकातील सर्व प्रमुख पात्र महिला आहेत... मग आता पुरुष असणे 'अप्रासंगिक' झाले आहे का?'

Akshay and Twinkle

सुंदर जीवन जगण्यासाठी पुरुषांची गरज

हा प्रश्न ऐकून ट्विंकल हसत हसत म्हणते, 'नाही, अजिबात नाही! जसे खाल्ल्यानंतर गोड काहीतरी हवे असते, त्याचप्रमाणे सुंदर जीवन जगण्यासाठी आपल्या सोबत पुरुषांची गरज असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshay and Twinkle