Hardik - Akshaya : 'अंजलीबाईं'च्या लग्नाची साडी 'राणादा'ने स्वतः विणली!

सकाळ डिजिटल टीम

तुझ्यात जीव रंगला या मराठी सिरीयल मधील अभिनेता हार्दिक जोशी व अभिनेत्री अक्षया देवधर हे पडद्यावरील आय़ुष्याप्रमाणे आता खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जीवनसाथी बनणार आहेत.

काही दिवसांतच ते लग्न बंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

लग्नाची खरेदी म्हणजे गडबड धावपळ. या दोघांच्या घरातही ही लगबग दिसून आली आहे.

अक्षया आणि हार्दिक या दोघांनीही आपल्या लग्नाची तयारी सुरू केली असून त्यांची तयारीची पद्धत थोडी हटके आहे.

अक्षयाने आपल्या लग्नाची साडी स्वतःच्या हाताने विणली आहे.

यावेळी अक्षयासोबत हार्दिकनेही त्या साडीमध्ये धागा विणला आहे.

यावेळी या दोघांच्याही जवळचे त्यांच्यासोबत होते. अभिनेत्री वीणा जगताप, अभिनेत्री रुचा आपटे हेही हार्दिक आणि अक्षयाच्या सोबत होते.

दोघांच्याही घरचे काही जवळचे नातेवाईकसुद्धा यावेळी यांच्यासोबत होते. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

अक्षया आणि हार्दिक यांनी तुझ्यात जीव रंगला या मराठी मालिकेमध्ये एकत्र काम केलं होतं. दोघांनी यामध्ये पतीपत्नीची भूमिका साकारली होती.

पडद्यावर ही जोडी बरीच लोकप्रिय ठरली होती. आता त्यांचं खऱ्या आयुष्यातलं लग्नही त्यांचे चाहते एन्जॉय करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Joshi Akshaya Deodhar | Sakal