Bramhastra: आलिया - रणबीरला 'बजरंग दलाचा' दणका!

सकाळ डिजिटल टीम

ज्या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या काही वर्षांपासून वाट पाहत होते तो ब्रम्हास्त्र दोन दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

रणबीर आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे.

करण जोहरची निर्मिती असलेल्या ब्रम्हास्त्रचे बजेट 400 कोटींचे असल्याचे सांगण्यात आले असून या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

ब्रम्हास्त्रवरुन आलिया आणि रणबीरला ट्रोल केले जात आहे. रणबीरनं बीफ खाण्यासंबंधी त्याच्या एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. त्यावरुन त्यांच्यावर टीका होतेय.

आलिया रणबीर ब्रम्हास्त्रसाठी महाकालेश्वर मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या निषेधाला सामोरं जावं लागलं आहे.

महाकालेश्वर मंदिरात जाण्यास त्यांना मनाई करण्यात आल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगलेच सुनावल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

रणबीरला त्याच्या जुन्या मुलाखतीवरुन ट्रोल करण्यात येत आहे. बीफ खाण्यावरुन त्यानं केलेलं विधान आता ब्रम्हास्त्रसाठी अडचणीचे ठरत आहे.

सोशल मीडियावर देखील ब्रम्हास्त्रबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. त्यात आलिया आणि रणबीवर टीका होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.