अंबाती रायुडूने बीसीसीआयला दिला जोर का झटका धीरे से?

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडूने गेल्या आयपीएल हंगामात फायनल सामन्यावेळी निवृत्तीची घोषणा केली होती.

Ambati Rayudu

यानंतर अंबाती रायुडू हा आता कॉमेंट्री बॉक्स किंवा प्रशिक्षकाच्या भुमिकेत दिसेल असे वाटले होते. मात्र अंबाती रायुडूने निवृत्तीनंतर एक मोठा डाव खेळला आहे.

Ambati Rayudu

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार रायुडू आता आयपीएलनंतर कॅरेबियन प्रीमियर लीग आणि मेजर प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहे.

Ambati Rayudu

रायुडूने CPL मधील संघ सेंट किट्स संघासोबत करार केला आहे तर अमेरिकेतील मेजर क्रिकेट लीगमधील नेविस प्रेट्रॉईट्स संघासोबत करार केला आहे.

Ambati Rayudu

रायुडू आता CPL मध्ये खेळणारा भारताचा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी प्रविण तांबे देखील कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळला होता.

Ambati Rayudu

रायुडूच्या मेजर लीग क्रिकेटमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयानंतर बीसीसीआयने निवृत्त खेळाडूंसाठी एक कूलिंग ऑफ कालावधी ठेवण्याचा विचार सुरू केला होता.

Ambati Rayudu

मात्र बीसीसीआयने यावर अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. तेवढ्यात अंबाती रायुडूने कॅरेबियन लीगमधील सेंट किट्स संघाशी करार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambati Rayudu