अंकिता खाणे (Ankita Khane)
अभिनेत्री मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खानने ६ वर्षांनी दुसरं लग्न केलं आहे.
अरबाज खान आणि शूरा खान यांचा विवाह सोहळा बहीण अर्पिताच्या घरी हा सोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात कुटुंबिय आणि काही जवळचे लोक सहभागी झाले होते.
सलमान खान, अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान देखील लग्न सोहळ्याला उपस्थित होता. याशिवाय रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, बाबा सिद्दीकी, सलमा खान, हर्षदीप कौर, युलिया वंतूर यांनी देखील या लग्नाला हजेरी लावली.
अरबाज आणि मलायका यांनी १९९८ मध्ये लग्न केलं होतं. २०१७ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे.
अरबाजसोबत घटस्फोटानंतर मलायका आणि अर्जुन कपूर रिलेशनशिपमध्ये आहेत.
शूरा ही बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मेकअप आर्टिस्ट आहे.
मुंबईतील अर्पिता खानच्या घरी हा विवाहसोहळा पार पडला. अरबाज आणि शूराने त्यांच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.