आरोग्यपूर्ण आहार असूनही वजन वाढतंय? नक्की करा या चाचण्या...

Aishwarya Musale

आरोग्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार आवश्यक असला तरी काही वैद्यकीय समस्यांमुळे देखील विनाकारण वजन वाढते.

आज आपण अशा काही चाचण्याबाबत माहिती घेणार आहोत ज्यामुळे आरोगयपूर्ण आहार असूनही वजन का वाढते हे समजण्यास मदत मिळेल.

थायरॉईड फंक्शन टेस्ट

थायरॉईड ग्रंथी चयापचय नियंत्रित करण्यात महत्वाची भूमिका बजावते. टीएसएच (थायरॉईड स्टीम्युलेटिंग हार्मोन) आणि टी 4 (थायरॉक्सिन) पातळी, यासारख्या चाचण्या थायरॉईडच्या कार्याचे मूल्यांकन करण्यास आणि वजन बदलास कारणीभूत असणाऱ्या समस्या समजण्यास मदत करू शकतात.

इन्सुलिन रेजिस्टन्स आणि ग्लुकोज टॉलरन्स

ग्लुकोज टॉलरन्स टेस्टमध्ये शरीर ग्लुकोज सेवनाला कसा प्रतिसाद देते हे समजते आणि इन्सुलिन संवेदनशीलतेचे मूल्यांकन करते. इन्सुलिन रेजिस्टन्स लक्षात घेतल्याने वेळीच व्यवस्थापन आणि वजन वाढणे प्रतिबंधित करण्यात मदत मिळू शकते.

हार्मोन पॅनेल

हार्मोन्समधील कॉर्टिसोल आणि सेक्स हार्मोन्स (इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन) यांच्या असंतुलनामुळे वजन वाढणे आणि चरबी वितरण यावर परिणाम होऊ शकतो.

हार्मोन पॅनेल टेस्ट आरोग्यपूर्ण खाल्ल्यानंतरही वजन वाढण्यास कारणीभूत असलेल्या हार्मोनल असंतुलनाबद्दल महत्वाची माहिती देऊ शकते.

फूड सेन्सीटीव्हिटी तपासणी

फूड सेन्सीटीव्हिटीमुळे जळजळ होणे शरीरात पाणी साचणे यासारख्या समस्या उद्भवून तात्पुरते वजन वाढण्याची शक्यता असते.

घाईघाईने खाण्याची सवय आरोग्यासाठी ठरू शकते घातक...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.