Flamingo Birds : येरळवाडी तलावात आले गुलाबी पंखांचे परदेशी पाहुणे; पाहा सुंदर PHOTO

सकाळ डिजिटल टीम

येरळवाडीत आगमन

खटाव तालुक्यात वाढत्या गुलाबी थंडीबरोबर चार ग्रेटर तर तीन जुवेनाइल परदेशी पाहुणे गुलाबी फ्लेमिंगोचे (रोहित, अग्निपंख) येरळवाडी (ता. खटाव) मध्यम प्रकल्पातील पाणथळीच्या भागात आगमन झाले आहे.

Flamingo Birds

रोहित पक्ष्यांचे थवे

खटाव तालुक्यात येरळवाडी, मायणी, कानकात्रे व सूर्याचीवाडी तलावात रोहित पक्ष्यांचे थवे थंडीत वास्तव्यात येतात.

Flamingo Birds

सात फ्लेमिंगोंची हजेरी

यातील सूर्याचीवाडी तलावात अपुरा पाणीसाठा असल्याने येरळवाडी तलावात सात फ्लेमिंगोंनी हजेरी लावली आहे.

Flamingo Birds

भारतातही आढळतात फ्लेमिंगो

हे पक्षी पेरू, चिली, मंगोलिया, बोलिव्हिया आणि अर्जेंटिनाच्या उच्च अँडिज रांगांत, तर भारतात कच्छच्या रणात मोठ्या प्रमाणात आढळतात.

Flamingo Birds

दुष्काळी पट्ट्यात पक्ष्यांची हजेरी

या भागात पडणाऱ्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कमी थंडीच्या म्हणजेच दुष्काळी तालुक्यात हे पक्षी हजेरी लावतात.

Flamingo Birds

पक्षीमित्रांची पावले वळली तलावाकडे

त्यांचे निरीक्षण करण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या ठिकाणांसह स्थानिक पक्षीमित्रांची पावले तलावाकडे वळतात.

Flamingo Birds

ग्रेटर फ्लेमिंगो

सध्या वडूजपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या येरळवाडी तलावात सात फ्लेमिंगो दाखल झाले आहेत. त्यातील चार हे ग्रेटर फ्लेमिंगो व तीन तरुण अर्थात जुवेनाइल पक्ष्यांचे आगमन झाले आहे. (फोटो : अंकुश चव्हाण)

Flamingo Birds

प्रत्येक क्षेत्रात महिलांचं पुरुषांच्या बरोबरीनं काम; पाहा 'नारीशक्ती'च्या विविध रूपांची चित्रमय झलक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.