कलाशिक्षकानं पिंपळाच्या पानांवर रेखाटला शिवरायांचा जीवनपट; महाराजांच्या भावमुद्रांनी जिंकली मनं

सकाळ डिजिटल टीम

शिवरायांना अनोखी मानवंदना

ढेबेवाडी : शिवप्रतापदिनानिमित्त कुठरे (ता. पाटण) येथील सेवानिवृत्त कलाशिक्षकाने छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली.

Chhatrapati Shivaji Maharaj Art Peepal leaves | eSakal

ॲक्रेलिक कलरचा वापर

पिंपळ पानांवर ॲक्रेलिक कलरचा वापर करून शिवरायांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग आणि त्यांच्या भावमुद्रा साकारल्या आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj Art Peepal leaves | eSakal

पिंपळाच्या पानात शिवरायांचे चित्र

रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे निवृत्त कलाशिक्षक दामोदर दीक्षित यांनी पिंपळाच्या पानात शिवरायांचे चित्र काढले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Art Peepal leaves | eSakal

घरात तयार केले कलादालन

त्यांनी स्वतःच्या घरात कलादालन तयार केले असून, ऑइल, वॉटर व ॲक्रेलिक रंगात स्वतः साकारलेली विविध विषयांवरील असंख्य चित्रे त्यांनी तेथे जतन करून ठेवलेली आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj Art Peepal leaves | eSakal

लॉकडाऊनमध्ये सुचली कल्पना

मध्यंतरीच्या लॉकडाऊनमध्ये त्यांना पिंपळाच्या पानावर चित्रे काढण्याची कल्पना सुचली.

Chhatrapati Shivaji Maharaj Art Peepal leaves | eSakal

300 हून अधिक आकर्षक चित्रे

अशा प्रकारची ॲक्रेलिक कलर वापरून साकारलेली व्यक्तिरेखांसह विविध प्रकारची ३०० हून अधिक आकर्षक चित्रे त्यांनी काढली.

Chhatrapati Shivaji Maharaj Art Peepal leaves | eSakal

वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्डमध्ये नोंद

त्यामध्ये पिंपळाच्या पानावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि त्यांच्या विविध भावमुद्रा साकारल्या आहेत. त्यांच्या या कामाची वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. (फोटो : राजेश पाटील)

Chhatrapati Shivaji Maharaj Art Peepal leaves | eSakal

'हम कहाँ जाएं सादगी लेकर' रिंकूला म्हणायचं तरी काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rinku Rajguru | sakal