वयाच्या 24 व्या वर्षी रिचाला मिळाली होती हृतिकच्या आईची भूमिका

Anuradha Vipat

बॉक्स ऑफिसवर हिट

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा हिचा नुकताच प्रदर्शित झालेला 'फुक्रे ३' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.

Richa chaddha

व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली

या चित्रपटात भोली पंजाबनची भूमिका साकारून रिचा चढ्ढाने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली.

Richa chaddha

हृतिक रोशनच्या आईची भूमिका ऑफर

अलीकडेच, अभिनेत्रीने खुलासा केला की वयाच्या 24 व्या वर्षी तिला हृतिक रोशनच्या आईची भूमिका ऑफर करण्यात आली होती.

Richa chaddha

वयाच्या 24 व्या वर्षी ही भूमिका ऑफर

संवाद साधताना तिला विचारण्यात आले की, 'तुला हृतिकच्या आईची भूमिका ऑफर करण्यात आली होती का?' यावर अभिनेत्री म्हणाली, 'होय, एका कास्टिंग डायरेक्टरने मला वयाच्या 24 व्या वर्षी ही भूमिका ऑफर केली होती.

Richa chaddha

मला या भूमिकेसाठी विचारले

त्याला कोणीतरी सांगितले की, मी एका वयस्कर स्त्रीची भूमिका चांगल्या प्रकारे साकारते, म्हणून त्याने विचार न करता मला या भूमिकेसाठी विचारले.

Richa chaddha

हे मला खूप चुकीचे वाटते

अभिनेत्री पुढे म्हणाली, 'तुम्ही तरुण अभिनेत्यांच्या चेहऱ्याचे वय वाढवता आणि नंतर त्यांना तुमच्या चित्रपटात कास्ट करता हे मला खूप चुकीचे वाटते.

Richa chaddha

डायरेक्टरने मला पुन्हा फोन केला नाही

मला असेही वाटले की जर मी ही भूमिका स्वीकारली तर त्या भूमिकेसाठी खरोखर योग्य असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्रींवर अन्याय होईल, कारण ज्येष्ठ अभिनेत्रींकडे पर्याय कमी असतात. ही ऑफर नाकारल्यानंतर त्या कास्टिंग डायरेक्टरने मला पुन्हा फोन केला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Richa chaddha