सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करणं टाळा; काय आहे धोका?

Sudesh

सायबर हल्ले

आजकाल तंत्रज्ञान ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्याच वेगाने सायबर गुन्हेगार देखील गुन्हा करण्याचे वेगवेगळे प्रकार शोधत आहेत.

Juice Jacking Scam | eSakal

चार्जिंग

मोबाईल हॅक करण्यासाठी आता एक नवीन पद्धत समोर आली आहे. यामध्ये चार्जिंगला लावताच मोबाईलमधील डेटा चोरला जाऊ शकतो.

Juice Jacking Scam | eSakal

ज्यूस जॅकिंग

या प्रकाराला 'ज्यूस जॅकिंग' असं म्हटलं जातं. मोबाईलच्या चार्जिंगला इंटरनेटवर 'ज्यूस' असा एक शब्द वापरला जातो. यामुळेच हॅकिंगच्या या प्रकाराला असं नाव पडलं आहे.

Juice Jacking Scam | eSakal

सार्वजनिक ठिकाण

यासाठी हॅकर्स सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या चार्जिंग पोर्ट्सचा आधार घेतात. यात शक्यतो रेल्वे स्थानक, बस स्थानक किंवा रेल्वेमधील चार्जिंग पोर्टचा समावेश असतो.

Juice Jacking Scam | eSakal

चार्जिंग केबल

तुम्हाला माहिती असेल, की आपल्या फोनची चार्जिंग केबल ही डेटा ट्रान्सफर करण्यासाठी देखील उपयोगी आहे. याचाच वापर ज्यूस जॅकिंग करण्यासाठी होतो.

Juice Jacking Scam | eSakal

असा होतो हॅक

हॅकर्स सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या चार्जिंग पोर्टमध्ये असं डिव्हाईस बसवतात, ज्यातून मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये मालवेअर सोडता येईल. चार्जिंग केबलच्या माध्यमातून हे घडतं.

Juice Jacking Scam | eSakal

मालवेअर

मालवेअर फोन किंवा लॅपटॉपमध्ये आल्यानंतर ते त्यातील डेटा चोरून आपल्या सर्व्हरकडे पाठवण्यास सुरू करतं. बऱ्याच वेळा फोन चार्जिंगवरुन काढल्यानंतर देखील हे मालवेअर कार्यरत राहतं.

Juice Jacking Scam | eSakal

खबरदारी

यावर खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग करणे टाळणं हाच उपाय आहे. प्रवासात मोबाईलची चार्जिंग करण्यासाठी शक्यतो पॉवर बँकची मदत घेणं उत्तम.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Juice Jacking Scam | eSakal