Axar Patel Wife : चाहते दुःखात; अक्षर पत्नीसोबत फिरतोय इटलीत

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा पराभव

भारतीय कसोटी संघाचा ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची गदा पटाकवली. सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचूनही पराभव झाल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते दुःखात आहेत.

इन्स्टाग्राम फोटो

मात्र भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आपल्या पत्नीसोबत इटलीत मजा करतोय. अक्षर सामना झाल्यानंतर इंग्लंडवरून इटलीला रवाना झाला. अक्षरच्या पत्नीने याबाबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.

इटलीत सुट्टी

मिळालेल्या माहितीनुसार अक्षर पटेलची पत्नी मेहाWTC फायनलदरम्यान त्याच्या सोबतच होती. तिथून ते दोघेही इटलीला गेले.

डायटिशियन पत्नी

अक्षरची पत्नी मेहा ही डायटिशियन आहे. तीचे सोशल मीडियावर देखील चांगले फॅन फॉलोइंग आहे.

26 जानेवारीला लग्न

अक्षर आणि मेहा यांनी मोठा काळ एकमेकांना डेट केले. त्यानंतर त्यांचा 2022 मध्ये साखरपुडा झाला. तर 26 जानेवारी 2023 ला वडोदरा येथे लग्न केले.

अक्षर खेळला नाही

अक्षर पटेल ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या WTC फायनलमध्ये प्लेईंग 11 मध्ये नव्हता. मात्र तो मैदानावर फिल्डिंग करताना दिसला होता. त्याने एक उत्कृष्ट धावबाद देखील केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.