भारताचा एक योद्धा ज्याने देशासाठी लढताना कापला होता स्वत:चा हात

Manoj Bhalerao

वयाच्या ८०व्या वर्षी जेव्हा लोक चालताना काठीचा आधार घेतात, तेव्हा या योद्ध्याने आपल्या शौर्याने ब्रिटीश सैन्याचा नाकी नऊ आणले होते.

या योद्ध्याच्या शौर्याचे किस्से लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत आणि इतिहासाच्या अनेक पुस्तकात नोंदही आहे.

त्यांच्याबद्दल ऐकून प्रत्येक भारतीयाचा अभिमानाने उर भरुन येईल.त्यांच्याबद्दल एक खास गोष्ट आहे.

या महान योद्ध्याचं नावं आहे, बाबू वीर कुंवर सिंह.

उत्तरप्रदेशमधील बलियाजवळ ब्रिटीशांविरुद्ध झालेल्या युद्धात त्यांच्या एका हाताला गोळी लागली होती.

तेव्हा कुंवर सिंह गंगा नदी ओलांडून आराकडे येण्याचा प्रयत्न करत होते.

हाताला गोळी लागल्याने विष पूर्ण शरिरात पसरू नये, म्हणून त्यांनी आपला हात कापून गंगेत वाहिला.

काही दिवसांनंतर २६ एप्रिल १८५८साली जगदिशपुरा या ठिकाणी त्याचं निधन झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.