बजाजने लाँच केलं चेतकचं परवडणारं व्हर्जन, पाहा फीचर्स अन् किंमत

Sudesh

बजाज चेतक

बजाजने आपल्या इलेक्ट्रिक चेतक गाडीचं नवीन मॉडेल लाँच केलं आहे.

Bajaj Chetak Urbane | eSakal

अर्बेन

Chetak Urbane असं या नवीन मॉडेलचं नाव आहे. ही स्कूटर आणखी परवडणाऱ्या दरात लाँच करण्यात आली आहे.

Bajaj Chetak Urbane | eSakal

किंमत

नवीन बजाज चेतक अर्बेन या गाडीची किंमत 1.15 लाख रुपयांपासून सुरू होते. ही एक्स शोरुम प्राईज आहे.

Bajaj Chetak Urbane | eSakal

किंमत

याच्या टॉप मॉडेलची किंमत 1.21 लाख रुपयांपासून सुरू होते. या दोन्ही व्हेरियंटमध्ये एकाच प्रकारची बॅटरी देण्यात आलेली आहे.

Bajaj Chetak Urbane | eSakal

रेंज

या स्कूटरमध्ये 2.9kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 113 किलोमीटर जाते असा दावा कंपनीने केला आहे.

Bajaj Chetak Urbane | eSakal

टॉप स्पीड

या स्कूटरच्या बेस व्हेरियंटचा टॉप स्पीड 63 किलोमीटर प्रतितास एवढा आहे. तर टॉप मॉडेलचा वेग 73 Kmph एवढा जातो. याच्या बेस मॉडेलमध्ये केवळ Eco रायडिंग मोड आहे. तर टॉप मॉडेलमध्ये Eco आणि Sport असे रायडिंग मोड मिळतात.

Bajaj Chetak Urbane | eSakal

LCD स्क्रीन

यामध्ये LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. यामध्ये स्कूटरचा वेग, बॅटरी रेंज इत्यादी माहिती मिळते. यासोबतच यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी फीचरही मिळतं.

Bajaj Chetak Urbane | eSakal

चार्जिंग स्पीड

या बाईकमध्ये 650W चार्जर दिला आहे. यामुळे बाईकला पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तास 50 मिनिटे वेळ लागतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajaj Chetak Urbane | eSakal