WI vs IND : बीसीसीआयने या 5 खेळाडूंवर केला अन्याय

अनिरुद्ध संकपाळ

वॉशिंग्टन सुंदर (वनडे)

वॉशिंग्टन सुंदर 2023 च्या सुरूवातीपासून वनडे संघाचा भाग होता. त्याने 16 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या, 233 धावा केल्या मात्र त्याला वेस्ट इंडीज विरूद्धच्या वनडे संघात निवडण्यात आले नाही.

Washington Sunder

सूर्यकुमार यादव (कसोटी)

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये सूर्यकुमार यादवने कसोटी पदार्पण केले होते. तो WTC Final मध्ये देखील राखीव खेळाडूंमध्ये होता. मात्र आता त्याला कसोटी संघातून डच्चू देण्यात आला आहे.

surya Kumar Yadav

अर्शदीप सिंग (वनडे)

अर्शदीप सिंगने टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला न्यूझीलंड दौऱ्यावरील कीन वनडे सामन्याच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळाले. मात्र आता त्याला संघात घेण्यात आलेले नाही.

Arshdeep Singh

अभिमन्यू इश्विरन (कसोटी)

बंगालचा सलामीवीर अभिमन्यू इश्वरन गेल्या काही काळापासून भारतीय संघासोबत आहे. तो रिझर्व खेळाडू म्हणून संघासोबत असतो. त्याला वेस्ट इंडीज दौऱ्यावर संधी मिळणार असे वाटत होते. मात्र त्याची निराशा झाली.

Abhimanyu Easwaran

सर्फराज खान (कसोटी)

सर्फराज खानने गेल्या काही रणजी हंगामात शतके, द्विशतके ठोकण्याचा धडाका लावला होता. त्याला वेस्ट इंडीज दौऱ्यावर कसोटी संघात स्थान मिळेलच असे बोलले जात होते. मात्र निवडसमितीने त्यालाही वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarfaraz Khan