कसोटीत सरासरी 66 ची तरी... 'या' पाच खेळाडूंकडे दुर्लक्ष?

अनिरुद्ध संकपाळ

भारतीय निवडसमितीने नुकतेच इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली. यावेळी अनेक खेळाडूंना संधी मिळालेली नाही.

सौरभ कुमार

उत्तर प्रदेशचा फिरकीपटू सौरभ कुमारने 65 प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत 280 विकेट्स घेतल्या आहे. भारतीय अ संघाकडून खेळताना देखील त्याने दमदार कामगिरी केली होती. मात्र त्याच्यासाठी अजून टीम इंडियाचे दार उघडलेले नाही.

वॉशिंग्टन सुंदर

कसोटी क्रिकेटमध्ये वॉशिंग्टन सुंदरला खेळण्याची फार कमी संधी मिळाली आहे. मात्र त्यातही त्याने छाप सोडली. 4 कसोटी सामन्यात 6 डावात फलंदाजी करत त्याने 3 अर्धशतके ठोकली. त्याची सरासरी 66 इतकी आहे.

अभिमन्यू इश्वरन

अभिमन्यू इश्वरनला अनेकवेळा भारतीय संघात सामिल करण्यात आलं. मात्र त्याला प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने 89 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 47 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

सरफराज खान

सरफराज खानने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत. मात्र त्याला भारतीय संघात काही घेतलं जात नाहीये. मधल्या फळीत खेळणाऱ्या सरफराजच्या कष्टाचं फळ कधी मिळतंय हे पहावं लागेल.

रजत पाटीदार

कसोटीत मधल्या फळीत शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांची कामगिरी म्हणावी तितकी चांगली झालेली नाही. दुसरीकडे रजत पाटीदारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 54 सामन्यात 45 च्या सरासरीने 3845 धावा केल्या आहेत. यात 11 शतकी खेळींचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.