डोळ्यांना बर्फ लावण्याने काय फायदा होतो? Skin Care

Aishwarya Musale

बर्फाचे तुकडे लावण्याचे अनेक फायदे

बर्फाचे तुकडे बहुतेक कोणतीही गोष्ट थंड करण्यासाठी वापरतात. पण तुम्ही कधी बर्फ डोळ्यांना लावलाय का? होय, चेहऱ्यावर बर्फाचे तुकडे लावण्याचे अनेक फायदे आहेत.

Ice cubes | sakal

डोळ्यांना मिळतात अनेक फायदे

पण डोळ्यांवर बर्फ लावला तरी डोळ्यांनासुद्धा अनेक फायदे मिळतात. अनेक जण सकाळी डोळ्यांवर बर्फ चोळतात, असे केल्याने फुगलेले डोळे आणि डोळ्यांचा थकवा दूर होतो.

Ice cubes | sakal

अनेक समस्यांपासून सुटका

जर तुम्हीही विचार करत असाल की डोळ्यांना बर्फ लावणे कितपत चांगले आहे, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, डोळ्यांवर बर्फ लावल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते.

Ice cubes | sakal

थकवाही दूर होतो

जेव्हा आपण रात्री नीट झोपू शकत नाही, तेव्हा सकाळी आपल्या डोळ्यांना सूज आणि फुगवटा दिसतो. अशावेळी बर्फाचे 4 तुकडे डोळ्यांवर लावल्यास सूज दूर होते आणि डोळ्यांचा थकवाही दूर होतो.

Ice cubes | sakal

थंडावा मिळतो

बर्फ लावल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो, तर डोळ्यात लालसरपणा असेल तर डोळ्यात बर्फ लावल्याने ती समस्याही दूर होते.

Ice cubes | sakal

डोळ्यांच्या दुखण्यापासून आराम

ज्या लोकांना डोळ्यात कोरडेपणा जाणवतो त्यांनी डोळ्यांवर बर्फ लावावा. यामुळे डोळ्यांच्या दुखण्यापासून आराम मिळतो. डोळ्यांखालच्या वर्तुळाची समस्या लोकांमध्ये खूप आढळून येते.

Ice cubes | sakal

डार्क सर्कल्स कमी होतात

परंतु जर आपण डोळ्यांभोवती बर्फ लावला तर आपल्याला नैसर्गिकरित्या डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होईल.

Ice cubes | sakal

कारण बर्फ डोळ्यांना चोळल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ice cubes | sakal