गुंतवणुकीसाठी 'एसआयपी' आहे बेस्ट; काय आहेत फायदे?

Sudesh

बचत

आपल्याला लहानपणापासून पैसे साठवण्याची सवय लावली जाते. पिगिबँकमध्ये साठवलेले पैसे गरजेच्या वेळी कामी आलेले आपण पाहिलं आहे.

SIP benefits | eSakal

गुंतवणूक

पैशांची बचत जेव्हा तुम्ही करता, तेव्हा साठवलेल्या पैशांचं मूल्य कालांतराने घटत जातं. यासाठीच बचतीसोबतच गुंतवणूक करणंही गरजेचं असतं.

SIP benefits | eSakal

एसआयपी

एसआयपी - म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. या माध्यमातून म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले जातात.

SIP benefits | eSakal

एसआयपीचे फायदे

एसआयपी सुरू करण्याचे कित्येक फायदे आहेत. या फायद्यांमुळेच सोने किंवा इतर गोष्टींच्या तुलनेत एसआयपी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरतो.

SIP benefits | eSakal

सरासरी मूल्याचा लाभ

एसआयपीद्वारे गुंतवणूक करत असताना, शेअर बाजार कोसळल्यास तुमचा फायदा होतो. कारण तुमच्या ठराविक रकमेच्या बदल्यात तुम्हाला अधिक युनिट मिळतात. या विरुद्ध स्थितीमध्ये युनिट कमी होऊ शकतात.

SIP benefits | eSakal

अस्थिरतेवर मात

एसआयपी ही शक्यतो लाँग-टर्म उद्दिष्टाने सुरू केली जाते. त्यामुळे शेअर बाजारातील अस्थिरतेवर मात करणं शक्य होतं.

SIP benefits | eSakal

शिस्त

एसआयपीमुळे नियमित आणि दीर्घकाळ गुंतवणुकीची सवय लागते. त्यामुळे जोखीम देखील कमी होते.

SIP benefits | eSakal

लवचिकता

कित्येक कंपन्या तुम्हाला अगदी 100 रुपयांच्या गुंतवणुकीपासून एसआयपी सुरू करण्याची मुभा देतात. तसेच तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही हे बंद करू शकता. यासाठी वेगळी फी वा दंड आकारला जात नाही.

SIP benefits | eSakal

मोठी साठवणूक

एसआयपीच्या माध्यमातून दरमहा ठराविक रक्कम साठवले आणि गुंतवले जातात. यामुळे कालांतराने एक मोठी रक्कम उपलब्ध होते. यामध्ये तेवढ्या महिन्यांचं व्याजही जोडलं जातं.

SIP benefits | eSakal

नोंद - म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIP benefits | eSakal