हिमालयातील हे तलाव: पर्यटकांचे पहिले प्रेम!

Swapnil Kakad

पॅंगॉन्ग लेक

जसे तुम्ही ह्या लेकच्या जवळ पोहोचता त्या क्षणी तुम्ही एक अद्भुत अनुभव आणि आठवण परत घेऊन जाणार ह्याची तुम्हाला जाणीव होते.

पॅंगॉन्ग लेक

सूरज ताल

भारतातील तिसऱ्या सर्वात उंचीवर असलेला हा तलाव म्हणजे श्रद्धाळुंसाठी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याचे महत्वाचे ठिकाण. अनेक पर्यटक येथील विलक्षण नजाऱ्यांनी भारावून जातात.

सूरज ताल

सातताल लेक

येथील ताज्या स्वच्छ पाण्यासाठी आणि स्थलांतरित पक्षांचे हिमालयातील स्थान असलेला हा लेक हाइकिंगसाठी अगदी उत्तम ठिकाण आहे. फोटोग्राफर्स आणि पक्षिनिरीक्षकांसाठी हे ठिकाण म्हणजे अगदी पर्वणीच!

सातताल लेक

चंद्रताल लेक

अवघड रस्त्यांमुळे ह्या तलावाला तसे कमीच पर्यटक भेट देतात. त्यामुळे उंचावर शांततेत काही क्षण घालवायला हे ठिकाण अगदी उत्तम. चंद्रकोरीच्या आकाराचा हा तलाव एकदा नक्कीच पाहिला पाहिजे.

चंद्रताल लेक

त्सो मोरीरी

पॅंगॉन्ग लेकपासून ७ तासांच्या अंतरावर असलेला त्सो मोरीरी लेक म्हणजे नयनरम्य नजाऱ्यांचा खजिना. ४५२२ मीटर उंचीवर असलेला लेक तुम्हाला खऱ्या हिमालयाचे दर्शन घडवेल.

त्सो मोरीरी

पराशर लेक

मंडीपासून जवळ २७३० मीटर उंचीवरील हा लेक दिल्लीपासून वीकएंड ट्रिपसाठीचे गाडगी अनोखे ठिकाण! वाटीसारख्या आकाराचा तलाव आणि मधेच तरंगते द्वीप पर्यटकांच्या मनात घर करते.

पराशर लेक

गुरुडोंगमर लेक

५१८३ मीटर उंचीवर स्थित हा तलाव देशातील सर्वात उंचावरील तलावांपैकी एक आहे. सिक्कीममधील पर्यटनाचे आकर्षण हा सुंदर तलाव, स्फटिकाप्रमाणे पारदर्शक पाणी, आणि बाजूला लावलेले रंगबिरंगी झेंडे तुमच्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाहीत.

गुरुडोंगमर लेक

सेला लेक

जगातील दुसऱ्या सर्वात उंचावर असलेल्या सेला पासवर स्थित अरुणाचल प्रदेशमधील हा तलाव. सूर्याची किरणे तलावाच्या निळ्याशार पाण्यावर चमकतानाचा नजारा अगदी थक्क करून जातो.

सेला लेक

रिवालसर लेक

१३६० मीटर उंचीवरील हिमाचल प्रदेशातील मंदीमधील हा तलाव देशातील सर्वात पवित्र जलसाठ्यांपैकी एक मानला जातो. चौकोनी आकाराचा हा तलाव तरंगणाऱ्या द्वीपांसाठी प्रसिद्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रिवालसर लेक