घाणेरड्या बाथरूम टाइल्समुळे वैतागलात? अशी करा सफाई Tips and trick

Aishwarya Musale

बाथरूम

आपण सकाळी उठल्यावर सर्वात पहिले बाथरूमचा वापर करतो. पण बाथरूम घाणेरडं असेल तर त्यामुळे अनेक प्रकारचे आजार पसरून आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

tiles | sakal

स्वच्छता

त्यामुळेच बाथरूमची नीट स्वच्छता गरजेची असते. बहुतांश लोक हे बाथरूम साफ तर करतात, पण तेथील टाईल्सवरील घाण तशीच राहते. त्यामुळे त्यांची चमकही कमी होते.

tiles | sakal

टाईल्स साफ करणे

बरीच लोकं बाथरूम टाईल्स साफ करण्यासाठी साबण किंवा डिटर्जंट पावडरचा वापर करतात. पण त्यामुळे टाईल्सवरील हट्टी डाग स्वच्छ होतातच असे नाही ना.

tiles | sakal

बेकिंग सोडा

बाथरूमच्या टाइल्सवर साचलेली घाण साफ करायची इच्छा असेल तर हे मिश्रण तुमच्यासाठी अतिशय उपयोगी ठरेल. त्यासाठी एका बाऊलमध्ये प्रथम 2 चमचे बेकिंग सोडा घ्या.

tiles | sakal

बाथरूम क्लीनर

व त्यात २ चमचे डिटर्जंट पावडर टाका. नंतर टाईल्सवर हार्पिक बाथरूम क्लीनर टाकून त्यावर बेकिंग सोडा व डिटर्जंटचे मिश्रण टाकावे व थोडा जोर लावून घासावे.

tiles | sakal

टाइल्स

बेकिंग सोडा हा अनेक हट्टी डाग घालवतो. त्याच्या वापराने टाइल्स नव्या प्रमाणे चमकू लागतील. बेकिंग सोडा व डिटर्जंटचे मिश्रण एकत्र करू ठेवा. नंतर टाइल्सवर हार्पिक टाकावे.

tiles | sakal

पाण्याने स्वच्छ धुवा

त्यावर बेकिंग सोडा व डिटर्जंटचे मिश्रण टाकून नीट पसरवावे. नंतर कपडे धुण्याच्या ब्रशने टाईल्स रगडून घासाव्यात व पाण्याने स्वच्छ धुवाव्यात. असे केल्याने टाइल्स चमकू लागतील.

tiles | sakal

ॲसिड

हार्पिकमध्ये थोडे ॲसिड असते, जे चांगली स्वच्छता करते. तसेच बेकिंग सोडा व डिटर्जंटच्या मिश्रणामुळे ॲसिडची क्षमता वाढते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tiles | sakal