BF.7 Variant : अशी वाढवा इम्युनिटी

सकाळ डिजिटल टीम

चीनमध्ये ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट BF.7 ने अक्षरक्षः धुमाकूळ घातला आहे.

इम्युनिटी हे कोरोनाविरुद्धचे आतापर्यंतचे सर्वात मोठे शस्त्र असल्याचे सिद्ध झाले आहे.

मजबूत इम्युनिटीच्या जोरावर करोडो लोकांनी कोरोनाला हरवले असल्याचे यापूर्वीदेखील अधोरेखित झाले आहे.

रोग प्रतिकारशक्ती मजबूत असल्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करू शकते.

कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येत इम्युनिटी वाढवण्यासाठी आहारात अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

फळे आणि भाज्यांचे भरपूर सेवन करावे. संत्री आणि लिंबासारखे पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी, दररोज व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे.

दररोज सुमारे 30 मिनिटे व्यायाम केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.

पुरेशी झोप घेतल्यानेदेखील रोगप्रतिकारक शक्ती अधिक बळकट होण्यासम मदत होते.

त्यामुळे दररोज 7-8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.