Awaidh Movie : जाहीर सभेत भाषण सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांवर अभिनेत्यानं रोखली बंदूक

Balkrishna Madhale

मुख्यमंत्र्यांवर रोखली बंदूक

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत अडथळा निर्माण करणं हे सोपं काम नाहीये. त्यातही मुख्यमंत्र्यांवर बंदूक रोखून धरणं हे देखील अवघड काम आहे.

व्यासपीठावर बंदूक घेऊन पोहोचला अभिनेता

मात्र, भोजपुरी सुपरस्टार खेसारीलाल यादवनंही असंच काहीसे केलंय. मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत तो बंदूक घेऊन व्यासपीठावर पोहोचला.

सोनभद्रमध्ये चित्रपटाचं शूटिंग

हा सीन भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादवच्या आगामी 'अवैध' चित्रपटातील आहे. या चित्रपटाचं शूटिंग सोनभद्र (यूपी) इथं झालं आहे.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

भोजपुरी सुपरस्टार खेसरीलाल यादव बंदूक घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सभेत पोहोचला. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बंदूक घेतली हिसकावून

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी खेसारीलाल यादव याच्या हातातून बंदूक हिसकावून घेतली. यावेळी खेसारी लाल यादव हसताना दिसत आहे.

'अवैध' चित्रपटाचं शूटिंग

भोजपुरी चित्रपट प्रचारक रंजन सिन्हा 'अवैध' चित्रपटात सीएम रंजन ठाकूर यांची भूमिका साकारत आहेत.

सेटवरील फोटो व्हायरल

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेतील रंजन सिन्हा यांचा फोटो लोकांना आवडला आहे. चित्रपटाच्या सेटवरील हे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

खेसारीलाल 'अवैध' चित्रपटात दिसणार

रंजन सिन्हा यांनी यापूर्वीही अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. बऱ्याच दिवसांनंतर ते खेसारीलाल यादवच्या 'अवैध' चित्रपटात दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhojpuri Superstar Khesari lal Yadav Photo