भुवनेश्वर कुमारचा कमबॅक सामन्यात तांडव!

Kiran Mahanavar

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने धमाकेदार पुनरागमन केले आहे.

टीम इंडियातून बाहेर असलेल्या या दिग्गज खेळाडूने रणजी ट्रॉफीमध्ये एका डावात 8 विकेट घेत खळबळ उडवून दिली होती.

भुवनेश्वर कुमारने बंगालविरुद्ध कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनाचा दावा केला.

6 वर्षांपूर्वी भारतीय संघासाठी शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमारने अशी कामगिरी दाखवली ज्याची दीर्घकाळ चर्चा होईल.

रणजी ट्रॉफीमध्ये या अनुभवी खेळाडूने बंगालविरुद्ध 22 षटके टाकली आणि 5 मेडन्ससह केवळ 41 धावा दिल्या आणि 8 बळी घेतले.

भुवनेश्वर कुमारची ही प्रथम श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यापूर्वी त्याने 77 धावांत 6 बळी घेतले होते.

चलो अयोध्या...! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला मिळाले आमंत्रण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar recieves invitation for Pran Pratishtha ceremony of Ram Temple in Ayodhya marathi news