Big Boss ला मिळाली नवी स्पर्धक; 'ती' वादग्रस्त ग्लॅमरस राजकारणी

प्रणाली मोरे

छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चेत राहिलेला वादग्रस्त शो बिग बॉस सिझन १६ ला लवकरच सुरुवात होत आहे. बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणाऱ्या स्पर्धकांची संभाव्य लिस्ट समोर येत आहे.

Esakal

बातमी आहे की बंगाली अभिनेत्री आणि तृणमुल कॉंग्रेसच्या संसदेतील सदस्य नुसरत जहां देखील बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार आहेत.

Esakal

नुसरत जहांला बिग बॉसच्या मेकर्सनी संपर्क साधल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मसालेदार ड्रामा आणि ग्लॅमरचा तडका असं दोन्ही पहायला मिळणार अशी चर्चा रंगली आहे.

Esakal

बिग बॉसच्या घरात नुसरत जहां येणार त्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आपल्याला जाणून घेता येईल यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Esakal

सध्या नुसरत जहां आणि शो च्या मेकर्सनी मात्र यादंसर्भात चुप्पी साधली आहे.

Esakal

नुसरत जहांचं पुढील काही महिन्यासाठीचं शेड्युल सर्वात बिझी आहे असं म्हटलं जात आहे. तिच्याकडे सिनेमाच्या ऑफर्स,जाहिराती आणि काही राजकीय कमिटमेंट्स असे एकंदरीत प्रोजेक्ट्स आहेत.

Esakal

सोशल मीडियावर नुसरत जहां नेहमीच सक्रिय पहायला मिळते. ती आपले ग्लॅमरस फोटोज शेअर करताना दिसते. गेल्याच वर्षी नुसरतने बंगली अभिनेता यश दासगुप्ताच्या मुलाला जन्म दिला आहे.

Esakal

'बिग बॉस १६' शो चा प्रीमियर ८ ऑक्टोबरला होणार असल्याचं बोललं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal