Independence Day : बॉलिवुडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्री आहेत आर्मी ऑफिसर्सच्या मुली

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमध्ये अशा काही प्रसिद्ध अभिनेत्री आहेत ज्यांच्या वडिलांनी भारतीय सैन्यदलात ऑफिसर म्हणून कामगिरी बजावली आहे.

या सर्व अभिनेत्रींच्या वडिलांनी देशाची सेवा केली आहे. आणि आपले आयुष्य देशसेवेसाठी आणि देशवासियांच्या संरक्षणासाठी खर्च केले आहे.

अनुष्का शर्माचे कुटुंब हे आर्मी बॅकग्राऊंडचे आहे. तिचे वडिल अजय कुमार शर्मा हे भारतीय सैन्यात कर्नल होते. १९९९ च्या ऐतिहासिक कारगिल युद्धात त्यांनी देशसेवेची कामगिरी बजावली आहे.

१९९४ ची मिस युनीवर्स सुष्मिता सेनचे वडिल सुबीर सेन भारतीय वायू दलात विंग कमांडर म्हणून रुजु होते. सष्मिता सेनने तिचे शिक्षण एअर फोर्स गोल्डन जुबली या संस्थेतून केले पूर्ण आहे.

अभिनेत्री लारा दत्ता ही माजी विंग कमांडर एल के दत्ता यांची मुलगी आहे. तिची बहिणही सध्या भारतीय सैन्य दलात काम करत आहे. त्यामुळे लारा दत्ताच्या कुटुंबामध्ये देश आणि देशसेवेबद्दल अतुट प्रेम आहे.

गुल पनागचे वडिल हरचरणजीत सिंह पनाग हे भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट जनरल म्हणून सेवा बजावत होते. त्यांच्या धाडसामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे.

निमरत कौर या अभिनेत्रीचे वडिल मेजर भूपिंदर सिंह महज हे वयाच्या ४४ वर्षी दहशतवाद्यांसोबतच्या एका लढाईत शहीद झाले. काश्मीरमधील वेरिनाग येथे त्यांचे पोस्टिंग होते.

ग्लोबल स्टार अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली प्रियंका चोप्रा हिचे आई-वडिल दोघांनीही भारतीय सैन्यदलात काम केले आहे. बॉर्डवर देशसेवा बजावणाऱ्या सैनिकांना सेवा देण्याचे काम ते करत होते. डॉ. अशोक चोप्रा आणि मधू चौप्रा हे आर्मीमध्ये देशसेवा बजावत होते.

नेहा धूपिया ही अभिनेत्री नेवी म्हणजे नौदल या बॅकग्राऊंडमधून येते. तिचे वडिल प्रदिपसिंह धूपिया हे नेवीमध्ये एक्स कमांडर राहिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.