साक्षी राऊत
बॉलीवूडमध्ये ८० च्या दशकांतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जयाजींचे नाव घ्यावे लागेल.
जयाजी यांनी त्यांच्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. आजही जयाजी यांचा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये समावेश होतो.
बॉलीवूडमधील वेगवेगळ्या दिग्गज अभिनेत्यांसोबत जयाजींनी काम केले. मात्र त्यांची जोडी प्रसिद्ध अभिनेता जितेंद्रसोबत अधिकच लोकप्रिय ठरली.
जयाची या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं बोलत नाहीत. त्यांना ते आवडतही नाही. कित्येक रियॅलिटी शोमध्ये त्यांनी त्याविषयी बोलणं टाळलं आहे.
जयाजी यांनी कधीही त्यांच्या सहकारी अभिनेत्री आणि अभिनेते यांच्यावर टीका केली नाही. मात्र त्यांचा दरारा असा होता की, सगळे त्यांच्याशी अदबीनं बोलायचे.
आपल्याला जी भूमिका आवडेल त्यासोबत कधीही प्रतारणा करायची नाही, हा नियम जयाजींनी कधीही मोडला नाही. यासाठी चाहत्यांकडून त्यांचे कौतूक होत असते.
आपण आपल्या मतांवर ठाम असावं. राजकारणात पाऊल टाकताना त्यांनी हे नेहमीच लक्षात ठेवले. म्हणून त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका झाली नाही.
बॉलीवूडमध्ये तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या जया प्रदा यांचा बॉलीवूडमधील प्रवास मोठा रंजक राहिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.