सकाळ डिजिटल टीम
अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) अनेकदा तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते.
नुकतंच फिल्मफेअर अॅवॉर्ड शोमध्ये (Filmfare Award) कतरिना कैफ लाल आणि हिरव्या रंगाच्या साडीत दिसलीय.
तिच्या या लूकचं चाहते खूप कौतुक करत आहेत. दरम्यान, कतरिनानं पती विकी कौशलचं चुंबन घेऊन आपलं प्रेम जाहीरपणे व्यक्त केलं.
कतरिना कैफ लाल आणि हिरव्या रंगाच्या साडीत दिसत आहे. या लूकमध्ये कतरिना खूपच क्यूट आणि सुंदर दिसत आहे.
डीपनेक ब्लाउज आणि ट्रेंडी इअररिंग्जमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत असून कतरिनाच्या स्टाईलनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
फिल्मफेअर अॅवॉर्ड्समध्ये पोहोचलेली कतरिना पती विकी कौशलचा हात धरताना दिसली आणि यासोबतच पतीचं चुंबनही तिनं घेतलं.
अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचा विवाह 9 डिसेंबर 2021 रोजी सवाई माधोपूर इथं झालाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.