Borewell Accident : तब्बल 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडली चिमुरडी, बचावकार्य सुरू

सकाळ डिजिटल टीम

बचावकार्य सुरू

मध्य प्रदेशमधील सिहोर जिल्ह्यातील मुंगावली गावात एक मूल बोअरवेलमध्ये पडल्याची घटना उघडकीस आलीये. या बाळाला वाचवण्यासाठी आता बचावकार्य सुरू आहे.

मुलगी पडली बोअरवेलमध्ये

शेतात खेळत असताना मुलगी बोअरवेलमध्ये पडली. यानंतर याची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली.

मंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना

सृष्टी कुशवाह असं बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलीचं नाव आहे. ही घटना मंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंगावली गावात दुपारी दोनच्या सुमारास घडलीये.

एनडीआरएफची टीम दाखल

या मुलीला वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम सतत जमिनीत खोदकाम करत आहे.

ऑक्सिजनचा पुरवठा

जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुलीला सतत ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. यासोबतच मुलीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जात आहे.

अडीच वर्षांची सृष्टी

300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेली अडीच वर्षांची सृष्टी आता जवळपास 100 फुटांवर पोहोचलीये. बचावकार्य कठीण होत आहे.

सुरक्षित बाहेर पडण्यासाठी प्रार्थना

सृष्टीचे नातेवाईक आणि ग्रामस्थ बोअरवेलमधून सृष्टी सुरक्षित बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sehore Borewell Accident