लाराचं विराटवरील वक्तव्य भानावर आणणारं?

अनिरुद्ध संकपाळ

भारताची विराट रन मशिन पुन्हा एकदा शतकांच दमदार उत्पादन करू लागली आहे.

विराट कोहलीने आतापर्यंत 80 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली असून तो सचिन तेंडुलकरच्या शतकांच्या शतकांचा विक्रम मोडण्याच्या जवळ पोहचत आहे.

विराट कोहली आता सचिनचा हा मोठा विक्रम मोडणार असं भारतीय छाती ठोकपणे सांगू लागले असतानाच ब्रायन लाराने सर्वांनांच भानावर आणलं.

ब्रायन लारानं विराट कोहलीसाठी अजून 20 शतकं ठोकणं किती कठिण आहे हे सविस्तर सांगितलं.

विराटने जरी वर्षाला 5 शतकं ठोकलं तरी त्याला 20 शतके पूर्ण करण्यासाठी 4 वर्षे लागतील. त्याचं वय 35 आहे. म्हणजे हा विक्रम मोडणार त्यावेळी तो 39 वर्षाचा असेल.

लाराच्या मते कितीही नाही म्हटलं तरी वय कोणासाठीही थांबत नाही. विराटने हा विक्रम मोडणं खूप अवघड असल्याचे तो म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.