बॉलिवूडच्या अभिनेत्रींचे ब्रायडल मेहंदीचे डिझाईन आहेत खूप खास!

Aishwarya Musale

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी लग्नगाठ बांधली आहे. अशा परिस्थितीत मुली अभिनेत्रींच्या लूकपासून खूप प्रेरणा घेतात. लेहेंग्यापासून ते अभिनेत्रींच्या ज्वेलरीपर्यंतचा ट्रेंड सेट झाला आहे.

आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रींचे सर्वोत्तम मेहंदी डिझाइनबद्दल सांगणार आहोत.

या डिझाईन्स साध्या आहेत पण हातावर काढल्यावर खूप सुंदर दिसतात.

कतरिना कैफ ब्रायडल मेहंदी

कतरिना कैफने तिच्या लग्नात फुल हॅन्ड हेवी मेहंदी काढली होती. अभिनेत्रीची मेहेंदी डिझाईन भरलेली होती, पण तिचा पॅटर्न खूप सिंपल आहे. हे डिझाइन सहजपणे तुम्ही काढू शकतात.

आलिया भट्ट ब्रायडल मेहंदी

आलिया भट्टची वेडिंग मेहंदी अगदी साधी होती. तिने सर्कल डिझाइनची मेहंदी काढली होती. या डिझाइनमध्ये, समोर आणि मागे सर्कल डिझाइन काढले होते. यासोबतच बोटांवर सिंपल पॅटर्नची मेहंदी काढली होती.

परिणीती चोप्रा ब्रायडल मेहंदी

परिणीती चोप्रानेही तिच्या लग्नात साधी मेहंदी डिझाईन काढली होती. अभिनेत्रीने तिच्या हातावर व्ही आकाराचे डिझाइन काढले होते. यासोबतच तिच्या पायावर बेल डिझाइन होते. ते बघायला खूप छान वाटत होतं.

मौनी रॉय ब्रायडल मेहंदी डिझाइन

मौनी रॉयने लग्नासाठी तिच्या कोपरापर्यंत ब्रायडल मेहंदी काढली होती. ही डिझायनर मेहंदी आहे.

मेहंदीमध्ये वधू-वरांची नावेही अनोख्या पद्धतीने लिहिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.