Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. शिवरायांनी केलेली बांधलेल्या वास्तू आजही अभेद्य आहेत.
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले गाव 'पार्वतीपूर' पुढे 'पार' नावाने ओळखले जाऊ लागले.
या पार गावाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मजबूत पूल बांधून घेतला होता.
८ मीटर रुंद असलेला हा पूल प्रतापगडाच्या उभारणीच्या दरम्यान १६५६-१६५८ या काळात बांधण्यात आला असावा.
कोयना नदी पार करण्यासाठी ५२ मीटर लांब आणि ८ मीटर रुंद असा हा दगडी पूल बांधण्यात आला आहे.
पूल पाच आधारांवर उभा असून त्यातून चार मजबूत कमानी तयार करण्यात आल्या आहेत.
कमानीमधील खांब पाण्याच्या वेगापासून वाचवण्यासाठी तिरक्या काटकोन रचनेत बांधण्यात आले आहेत.
संपूर्ण पूल केवळ चुन्यात बांधण्यात आला असून त्यात लोखंडाचा वापर नाही.
साडेतीनशे वर्षांनंतरही पुलाचा एकही दगड न सरकता तो आजही टिकून आहे.
दगडांच्या फटीत एकही झाड उगवलेले नाही हे पुलाच्या टिकाऊपणाचे ठोस प्रमाण आहे.
पुलाच्या दोन्ही बाजूंना एक फूट उंचीचा मजबूत दगडी कठडा आहे.
आपण ब्रिटिशांनी बांधलेल्या १०० वर्षांच्या पुलांचे कौतुक करतो, पण हा पूल ३५० वर्षे टिकला आहे.
३५० वर्षांनंतरही या पुलाला एकही तडा गेलेला नाही, हे त्याच्या दीर्घायुष्याचे उदाहरण आहे.
महाराष्ट्रातील हा पूल आजही अभेद्य स्थितीत खंबीरपणे उभा आहे.
दगडी पूल स्थापत्यकला व टिकाऊपणाचा प्रेरणादायक आदर्श ठरला आहे.
निसर्गाच्या आव्हानांना तोंड देत हा पूल ३५० वर्षांची प्रगल्भता आणि इतिहास साक्षी ठेवतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.