जगातील आठवं आश्चर्य ठरलं कंबोडियामधील हिंदू मंदिर; पाहा फोटो

Sudesh

अंगकोर वाट

कंबोडियामध्ये असणाऱ्या अंगकोर वाट मंदिराला आता जगातील आठवं आश्चर्य म्हटलं जात आहे. याबाबत अनौपचारिक घोषणा करण्यात आली आहे.

Angkor Wat Hindu Temple UNSECO | eSakal

युनेस्को

UNESCO ने यापूर्वीच Angkor Wat मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलं आहे. याठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात.

Angkor Wat Hindu Temple UNSECO | eSakal

इतिहास

बाराव्या शतकात राजा सूर्यवर्मन द्वितीय यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे. अंगकोर वाट हे सुरुवातीला विष्णु मंदिर होतं. कालांतराने याचं रुपांतर बौद्ध मंदिरात झालं.

Angkor Wat Hindu Temple UNSECO | eSakal

वास्तुशिल्प

यामुळेच या मंदिरांच्या भिंतींवर बौद्ध मूर्ती देखील दिसून येतात. मंदिराच्या आवारात ठिकठिकाणी सुंदर वास्तुशिल्प आहेत.

Angkor Wat Hindu Temple UNSECO | eSakal

आकार

हे मंदिर सुमारे 500 एकर क्षेत्रात पसरलेलं आहे. याच्या बाजूला असणाऱ्या भिंतींच्या चारही बाजूंनी खोल दरी आहे. या मंदिरात कमळाच्या आकाराचे पाच टॉवर देखील आहेत.

Angkor Wat Hindu Temple UNSECO | eSakal

सनराईज पॉइंट

अंगकोर वाट मंदिर एक प्रसिद्ध सनसाईज पॉइंट देखील आहे. सूर्योदयाच्या वेळी मंदिर गुलाबी, नारंगी आणि सोनेरी रंगांमध्ये न्हाऊन निघतं.

Angkor Wat Hindu Temple UNSECO | eSakal

सांस्कृतिक महत्त्व

हिंदू आणि बौद्ध संस्कृतींचं मिश्रण असलेल्या या मंदिराला मोठं सांस्कृतिक आणि अध्यात्मिक महत्त्व आहे. दोन्ही धर्मांचे लाखो भाविक या मंदिराला भेट देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Angkor Wat Hindu Temple UNSECO | eSakal