Cannes : काय सांगता! अनिल कुंबळे अवतरला कान्सच्या रेड कार्पेटवर

अनिरुद्ध संकपाळ

कान्स फिल्म फेस्टिव्हल म्हटलं की सुंदर अभिनेत्री आणि त्यांचे अतरंगी, ग्लॅमरस कपडेच डोळ्यासमोर येतात. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवत असतात. मात्र यंदा रेड कार्पेटवर भारताचा माजी क्रिकेटर पोहचला आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

भारताची माजी कर्णधार अनिल कुंबळे आपली पत्नी चेनतासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर दिसला.

कुंबळेच्या पत्नीने काळ्या रंगाची क्लासिक साडी नेसली होती. या साडीचे भरजरी मोठे काठ राजेशाही लुक देत होते.

=

दुसरीकडे भारताची माजी कर्णधार अनिल कुंबळे जो आपल्या साधेपणासाठी ओळखला जातो. त्याने जोधपूरी स्टाईलमध्ये वेलवेटचे ब्लेझर घातले होते. त्यामुळे ही जोडी एकदम राजेशाही दिसत होती.

दुसऱ्या एका फोटोत अनिल कुंबळे पांढऱ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये दिसत असून चेतनाने इंडो - वेस्टर्न पोषाख परिधान केला होता.

अनिल कुंबळे सध्या भारतात सुरू असलेल्या आयपीएलमध्ये समालोचक आणि जाणकाराच्या भुमिकेत दिसत आहे. यातूनच वेळ काढत त्याने कान्स फिल्म फेस्टिव्हलला भेट दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.