केकेआरचे कोच चंद्रकांत पंडितांनी वरूण चक्रवर्तीचा शर्ट कात्रीने का कापला?

अनिरुद्ध संकपाळ

केकेआरचे कोच चंद्रकांत पंडित हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात.

चंद्रकांत पंडितांची कोचिंग स्टाईल अनेकांच्या पचनी पडत नाही. विशेषकरून विदेशी खेळाडूंचा पंडितांच्या स्टाईलवर आक्षेप असतो.

दरम्यान, केकेआरचा माजी खेळाडू एन जगदीशनने चंदू पंडितांचा एक किस्सा सांगितला. हा किस्सा केकेआरचा स्टार गोलंदाज वरूण चक्रवर्तीसोबतचा आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोताना जगदीशन म्हणाला की, गेल्या वर्षी केकेआरच्या कॅम्पमध्ये चंदू पंडित यांनी खेळाडूंना आजचा दिवस हा स्लीव्हलेस डे असल्याचं सांगितलं होतं.

मात्र वरूण चक्रवर्तीने चुकून फूल स्लीव्ह असलेला टी-शर्ट घातला. त्यावेळी कोच चंदू पंडितांनी त्याच्या शर्टच्या बाह्या कात्रीने कापून टाकल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.